‘दोन दिवसाचे काम, उगाच बाहेर स्टंटबाजी’; शिंदे गटाच्या महिला नेत्याची मनसेवर घणाघाती टीका
राज्यातील रस्त्यांची दुरावस्था आणि पडलेल्या खड्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. तर पनवेलमध्ये राज ठाकरे यांनी देखील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सरकारला झापलं होतं.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांच्या आधीच रस्त्यांच्या दुरावस्थेवरून जोरदार फटकेबाजी केली होती. पनवेलमधील मुंबई-गोवा महामार्ग निर्धार मेळाव्यात त्यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होतं. तर चांद्रयान चंद्रावर पाठवण्याऐवजी येथे महाराष्ट्रात पाठवले असते तर बरं झालं असतं. खर्चही वाचला असता असा टोला लगावला आहे. तर एकदा आपल्या हातात सत्ता द्या… सगळं सुतागत सरळ करतो असे आवाहन देखील मतदारांना केलं आहे. त्यावरून आता शिवसेने शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी यामुद्द्यावर मनसेवर खोचक टीका केली आहे. सय्यद यांनी खोचक शब्दात ट्विट करत टीका केलीय. त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम हाथी घ्यावी. राज्यभरात जेवढे मनचेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे! आहेत. दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान करू नका. आणि बाहेर स्टंटबाजी पण करू! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा! असा खोचक टोमना देखील त्यांनी मनसेला लगावला आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

