Uttar Pradesh, Goa, Uttarakhand निवडणुकीत शिवसेनेचं चिन्ह ‘धनुष्यबाण’ -Tv9

उत्तर प्रदेशात आणि गोव्यात शिवसेना ही धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची महिती शिवसेना नेत्यांकडून देण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 25, 2022 | 5:57 PM

देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची (Five State Election) रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता आणण्यासाठी योगी आदित्यनाथ आणि भाजप पूर्ण जोर लावत आहे. आधीच डझनभर नेत्यांनी साथ सोडल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तर इतर राजकीय पक्षही जोमाने निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रोज एकमेकांवर राजकीय आरोप सुरू आहेत. उमेदवारांची फोडाफोडी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील जनतेला आपल्याकडे वळवण्याचा पूर्ण प्रयत्न या सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येतोय. उत्तर प्रदेशात आणि गोव्यात शिवसेना ही धनुष्यबाण या चिन्हांवर निवडणूक लढणार असल्याची महिती शिवसेना नेत्यांकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला शिवसेनेकडून तशी विनंती करण्यात आली होती, शिवसेनेची ही विनंती निवडणूक आयोगाने मान्य केल्याचे सांगण्यात आले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें