Omraje Nimbalkar : हॅलो… उदयजी मी एकनाथ शिंदे बोलतोय… निंबाळकरांकडून शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री अन् उडवली खिल्ली, बघा VIDEO
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची हॅलो शैलीची मिमिक्री केली. या भाषणातून त्यांनी विविध शासकीय कामांच्या पद्धतीवर उपहासात्मक टीका केली.
धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची मिमिक्री करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. निंबाळकरांनी शिंदे यांच्या बोलण्यातील विशिष्ट हॅलो या शब्दाच्या वापराची आणि कोणत्याही समस्येवर त्वरित तोडगा काढण्याच्या पद्धतीची उपहासात्मक नक्कल केली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मिमिक्रीमध्ये, निंबाळकरांनी शेवगाव येथील कथित २५० हेक्टर जमिनीच्या समस्येचा उल्लेख केला, जिथे शिवाजीराव काकडे यांनी सातबारा उताऱ्यासह सर्व कागदपत्रे दिली होती. यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करताना ते म्हणतात, “हॅलो उदयजी. मी आता कळंबमध्ये आलोय. मी एकनाथ शिंदे बोलतोय, उदयजी तुम्हीच का मंत्री? हो हो साहेब बोला. मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे. इथलं एक हलगट दूध देत नाही. तर ह्या हलगटाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या.” यानंतर उदय सामंतांनी लगेच एक चरवी भरून दूध दोन दिवसात आणून देतो असे आश्वासन दिल्याचे विनोदी वर्णन निंबाळकर यांनी केले, ज्यामुळे शासकीय कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

