Sanjay Raut | शिवसेना यूपीएत असणार का? पुढील 24 तासांत सांगणार, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून आणि त्यांनी परवानगी दिली तर मी तुम्हाला माहिती देईल, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी दिलं आहे.

नवी दिल्ली : ममता बॅनर्जींचा मुंबई दौरा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवरील घणाघाती टीका, या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) अर्थात यूपीएमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. मात्र, राहुल गांधी यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून आणि त्यांनी परवानगी दिली तर मी तुम्हाला माहिती देईल, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी दिलं आहे.

काही चर्चा चार भिंतीत असतात, त्या वरिष्ठांशीच करायच्या असतात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंशी बोलून त्यांनी परवानगी दिली तर मी तुमच्याशी बोलेन. राहुल गांधी यांच्याशी आज प्रदीर्घ चर्चा झाली. काही वेळ वेणुगोपालही सहभागी झाले होते. या भेटीत देशपातळीवर अनेक मुद्दे, पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Published On - 8:31 pm, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI