Video | कायदा सुव्यवस्था बिघडल्यास शिवसेना जबाबदार – प्रवीण दरेकर
भाजपच्या नेत्यांनी या प्रकारावरुन शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास शिवसेना जबाबदार असेल, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
मुंबई : राम मंदिराच्या कथित जमीन (Ram Mandir Land) घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत तुफान धुमश्चक्री झाली. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर प्रचंड हाणामारी केली. भाजप युवा मोर्चाने (BJP Yuva Morcha) शिवसेनेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप करत, माफी मागण्यासाठी थेट शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhawan) मोर्चा काढला. मात्र या मोर्चाची कुणकुण लागल्याने, सेना भवनासमोर आधीच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले होते. ज्यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना सोनिया सेना अशा घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यावेळी बाचाबाचीला सुरुवात झाली. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी या प्रकारावरुन शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास शिवसेना जबाबदार असेल, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

