Raigad | स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या अस्थी महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्लान
बुधवारी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी समोर राख सदृष्य पावडर आणि पुस्तक पुजन करण्यावरून वाद झाला. मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्या पुजा झोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरची घटना उघडकीस आणली.
बुधवारी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी समोर राख सदृष्य पावडर आणि पुस्तक पुजन करण्यावरून वाद झाला. मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्या पुजा झोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरची घटना उघडकीस आणली. काही लोक पुस्तक पुजनाच्या नावा खाली बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्तींचे किल्ले रायगडावर विसर्जन करीत असल्याचा त्याच प्रमाणे हि राख चंदन आणि आत्तरामध्ये भिजवुन शिव समाधीला लावत असल्याचा आरोप पुजा झोळे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदर पुस्तक आणि राख सदृष्य पावडर ताब्यात घेतली असुन सदर पावडर केमिकल ॲनालिसेससाठी पाठवला आहे. शिवप्रेमींना समाधी स्थळावर निर्माण झालेल्या वादाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

