Nagpur Violence Video : धक्कादायक… नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्…
महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाविरोधात गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात उद्रेक पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळातील नेते मंडळींकडून देखील प्रतिक्रिया येत आहेत. कुठे आरोप-प्रत्यारोप केले जात असताना याच मुद्यावरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या राड्याला हिंसक वळण निर्माण झाल्यानंतर नागपुरातील काही भागात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली होती. आजही तेथील वातावरण तणावपूर्ण आहे. मात्र एक धक्कादायक घडना या राड्यादरम्यान समोर आली आहे. नागपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत असून शहरातील राड्यादरम्यान भालदारपूरमधील संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरात सोमवारी संध्याकाळी दगडफेक झाल्यानंतर तणावाचे वातावरण होते. अशातच काही आंदोलकांनी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. मात्र हा सगळा प्रकार संध्याकाळच्या नंतर झाल्याने आंधार होता आणि याच अंधाराचा फायदा घेत जमावातील काहींनी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर आली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

