Panvel Video : आई म्हणावं की हैवाण… 8 वर्षाच्या पोटच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर…
या इमारतीत राहणाऱ्या महिलेने आपल्या आठ वर्षाच्या मुलीला घराच्या बेडरूमच्या खिडकीतून 29 व्या माळ्यावरून खाली फेकलं. त्यानंतर स्वतः देखील 29 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्या पोटच्या ८ वर्षांच्या मुलीला २९ व्या मजल्यावरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर असं कृत्य करणाऱ्या आईला म्हणावं की हैवाण असा सवाल उपस्थित केला जात आहे. इतकंच नाहीतर मुलीला २९ व्या मजल्यावरून फेकून आईची देखील उडी मारून आत्महत्या केली आहे. पनवेलमधील पळस्पे परिसरातील ही घटना असल्याची माहिती मिळतेय. मुलीला २९ व्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून फेकून आईने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल परिसरात घडला आहे. पनवेल येथील पळस्पे परिसरात असणाऱ्या बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे या अधिक तपास करत आहेत. आईने आपल्या मुलीला २९ व्या मजल्यावरून का फेकले? मुलाला २९ व्या मजल्यावरून फेकून दिल्यानंतर स्वतःनेही उडी का मारली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

