मुंबईः महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना मराठी पाट्या न लावण्याची सूट आता कायद्यातील पळवाट म्हणून वापरता येणार नाही. सरसकट सर्व दुकानांच्या पाट्या आता मराठी भाषेत असतील, असतील, अशी सुधारणा आता यासंदर्भातील कायद्यात केली जाणार असून या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Government) मंजुरी दिली. मात्र याला काही दुकानदारांचा विरोध आहे. मराठी अक्षरांची साईझ काय असेल ते आम्ही ठरवू असे काही दुकानदारांचे मत आहे. त्यामुळे मराठीला मुंबईतच संघर्ष करावा लागताना दिसतंय.