गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत्कार?
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी सुरु होती. अचानक एका पाठोपाठ असे एक देवी देवता तिथे अवतरू लागल्या. श्री राम आले, शंकर आले, लक्ष्मी, कालीमाता, पार्वती आले. पण, जेव्हा खुद्द श्री गणेश आले तेव्हा...
नाशिक : 28 सप्टेंबर 2023 | नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीत होणारा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय. सुमारे चार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी येथे कार्यरत आहेत. दुसरीकडे शहरातील अनेक मंडळांनी ढोल ताशे, डीजेच्या आवाजात गणेशाची मिरवणूक काढलीय. मात्र, यातील शिवसेवा मंडळाची विसर्जन मिरवणुकीने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतलंय. या मिरवणुकीच्या माध्यमातून शिवसेवा मंडळाने काही तरी वेगळा प्रयत्न केलाय. केरलमधील त्रिशूल गावातील कलाकारांचा जबरदस्त नृत्याविष्कार या निमित्ताने नाशिककरांना पाहायला मिळालाय. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत खुद्द श्री गणेश, शंकर, कालीमाता, लक्ष्मी, श्री राम, हनुमान, विष्णू आदी देव देवता सहभागी झाले होते.

