Sidharth Shukla Dies | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, कूपर रुग्णालयाबाहेरुन थेट

टीव्ही जगतातील प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला. त्याचे मुंबई येथे निधन झाले असून मुंबईतील कूपर रुग्णालय येथे त्याचे शवविच्छेदन केले जात आहे.

टीव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्ला याच आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाने अचानक जगाची एक्झिट घेतल्याने संपूर्ण इंडस्ट्रीसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या मुंबईतील कूपर रुग्णालय येथे त्याचे शवविच्छेदन केले जात आहे.

सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉस- 13 चा विजेताही राहिला आहे. यासोबतच त्याने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट टीव्ही कलाकारांमध्ये त्यांची गणना होते होती. गेल्या काही काळापासून तो अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही दिसत होता. तसेच, अलीकडेच अभिनेत्याने डिजीटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले. जिथे तो “ब्रोकन बट ब्यूटीफुल” मध्ये दिसून आला. सिद्धार्थला या मालिकेसाठी बरीच प्रशंसा मिळाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI