Move On … स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ…; पोस्टने खळबळ
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने तिचे लग्न रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांच्या प्रकृतीमुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. आता थेट हे लग्न रद्द झाल्याचे तिने स्पष्ट केले. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहनही तिने केले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना हिने तिचे लग्न रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. पलाश मुच्छलसोबत स्मृतीचे लग्न होणार होते. काही दिवसांपूर्वीच हे लग्न स्थगित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती, ज्याचे कारण वडिलांची प्रकृती स्थिर नसल्याचे सांगितले गेले होते. मात्र, आता थेट लग्न रद्द झाल्याचे स्मृती मंधानाने स्पष्ट केले आहे.
स्मृती मंधानाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली. यापूर्वी, तिच्या इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये तिच्या एंगेजमेंट रिंगचा अभावही लक्ष वेधून घेत होता. एंगेजमेंट आणि लग्नापूर्वीचे अनेक कार्यक्रम पार पडले होते. स्मृतीने दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. “मला हे प्रकरण इथेच संपवायचे आहे,” असेही तिने म्हटले आहे.

