‘गॅस आणि इंधनांचे दर वाढत चालले आहेत’ विमानातच काँग्रेस महिला नेत्यांचा स्मृती इराणींना सवाल
काँग्रेस महिला अध्यक्ष नेत्ता डिसोझा यांनी स्मृती इराणींना विमानातच इंधन आणि महागाईच्या वाढलेल्या दरांवरुन सवाल उपस्थित केले आहेत.
काँग्रेस महिला अध्यक्ष नेत्ता डिसोझा यांनी स्मृती इराणींना (Smruti Irani Video) विमानातच इंधन आणि महागाईच्या वाढलेल्या दरांवरुन सवाल उपस्थित केले आहेत. त्यांचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओनं सोशल मीडियात नव्या चर्चांना उधाण आलंय. इंधन दरवाढीचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर स्मृती इराणी केंद्र सरकारनं कोरोना काळात केलेल्या कामाची आकडेवारी सांगताना व्हिडीओच्या काही भागात ऐकू येतात. या व्हिडीओमुळे विमानातच थेट सवाल करणाऱ्या काँग्रेस नेत्या (Congress Leader) नेत्ता डिसोझा यांच्या धाडसाचंही कौतुक होतंय. देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर राज्यातील इंधन दरवाढीनं पुन्हा डोकं वर काढलंय. तसंच गॅस आणि सीएनजी, पीएनजीच्या किंमतीतही देशभरात वाढ होत असल्यानं (Inflation in India) सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. वाढत्या इंधन दरवाढीचा परिणाम थेट लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर होऊ लागलाय.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

