Video : भाजपच्या नगरसेवकाने महापौरांच्या दिशेने भिरकावली बाटली, सोलापूर महापालिकेतील प्रकार

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय वाचण्याच्या कारणावरून हा प्रकार समोर आला आहे. नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपला राग व्यक्त करत महापौरांच्या दिशेने भरसभेत पाण्याची बाटली भिरकावली.

सोलापूर: भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावल्याची घटना घडलीय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय वाचण्याच्या कारणावरून हा प्रकार समोर आला आहे. नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपला राग व्यक्त करत महापौरांच्या दिशेने भरसभेत पाण्याची बाटली भिरकावली. या प्रकारानंतर महापौर श्रीकांचनमा यनम यांनी सुरेश पाटलांना सभेतून निलंबित केले. याआधी सुरेश पाटील यांनी सर्वसाधारण सभेत माईक भिरकावून आपला राग व्यक्त केला होता.

सभेला सुरुवात होताच महापौरांनी रोलिंग दिल्याप्रमाणे नगरसचिव रवींद्र दंतकाळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास सुरुवात केली होती. विषय पत्रिका वाचून झाल्यानंतर महापौरांनी रोलिंग दिल्यानंतर सुरेश पाटील यांनी संबंधित विषयावर बोलण्याचा हट्ट धरला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI