आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
शिवसेना ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या संदर्भात मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
सोलापूर : शिवसेना ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या संदर्भात मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही काम करणारे लोक आहोत. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मला वाटतं की, आमदार रमेश बोरनारे हे अतिशय अभ्यासू आणि शांत व्यक्तिमत्व आहेत. ते असा प्रकार करणार नाहीत. हा प्रकार नक्की काय झाला हे मी पाहिलेला नाही ,याची अधिकृत माहिती घेऊनच मी बोलेन, असं संजय राठोड म्हणालेत. विदर्भात झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांबाबत आमचं चिंतन आणि अभ्यास सुरू आहे , असंही राठोड म्हणालेत.
Published on: Feb 08, 2023 11:52 AM
Latest Videos
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?

