Nashik News : सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप, पर्यटकांची गर्दी
नाशिकमधील सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेने आता प्रवाहित झाला आहे.
नाशिकमधील सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेने आता प्रवाहित झाला आहे. नाशिकमध्ये आज सकाळपासूनच पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला बघायला मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा गेल्या ८ दिवसांपासून प्रवाहित झालाय. त्यातच आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने देखील यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे या धबधब्याचं रौद्र रूप सध्या बघायला मिळत आहे.
दरम्यान, हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होतेय. पावसाने काहीशा विश्रांतीनंतर रात्रीपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे गंगापुर धरणातून आता 1760 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नाशिक येथील असलेल्या सोमेश्वर धबधबाने रौद्ररूप धारण केले आहे. याच ठिकाणी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळतेय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

