Parliament Security Breach : लोकसभेत नेमकं काय घडलं? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले…
संसदेत दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेतल्या आणि या दोन व्यक्तींनी संसद परिसरात एकच गोंधळ घातला या सगळ्या प्रकारावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाष्य केले आहे. संसदेत घडलेल्या गदारोळ झाल्यानंतर काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२३ : संसदेतील कामकाज सुरू असताना आज धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. संसदेत दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेतल्या आणि या दोन व्यक्तींनी संसद परिसरात एकच गोंधळ घातला या सगळ्या प्रकारावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, घडलेला प्रकार ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असल्याचे समोर येत आहे. तर लोकसभेच्या सुरक्षेबाबत जी काही चूक झाली त्याबाबत पूर्णपणे चौकशी करण्यात येईल. यासंदर्भात दिल्ली पोलिसांना देखील योग्य ते निर्देश देण्यात आले आहे. याप्रकरणात सखोल चौकशी करण्यात येईल असा शब्दही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले. तर आज संसदेत घडलेल्या गदारोळ झाल्यानंतर काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

