Special Report | दिल्लीत भेटीगाठी…गल्लीत चर्चा-tv9
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारत एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे-फडणवीसांचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं.
दिल्लीतल्या अर्जुन खोतकरांच्या या फोटोची जोरदार चर्चा सुरु झालीय…कारण यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर दिसतायत. त्यामुळं अर्जुन खोतकरही शिंदे गटात गेले की काय ?, अशी चर्चा सुरु झालीय..मात्र खोतकरांचं म्हणणंय की सध्या ते शिंदे गटात गेलेले नाहीत. आता गमंत बघा, खोतकर म्हणतात की अजून शिंदे गटात गेलेलोच नाही..पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयानं पत्रक जाहीर करत, खोतकरांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्याचं जाहीर केलंय. जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारत एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे-फडणवीसांचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार

