Special Report | निवडणुका झाल्यास सर्व उमेदवार ओबीसी देणार, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राज्य सरकारकडून या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jun 23, 2021 | 8:44 PM

पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राज्य सरकारकडून या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें