OBC Reservation : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीविरोधात न्यायालयात जाणार – पंकजा मुंडे

राज्य सरकारने टाईम बाऊंड कार्यक्रम आखून इम्पेरिकल डेटाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याच्या आरक्षणाचा आकडा ठरवून हा डेटा जर न्यायालयात सादर केला, तर ओबीसींची आरक्षण संरक्षित होऊ शकतं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

OBC Reservation : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीविरोधात न्यायालयात जाणार - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 3:21 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याविरोधात आता भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. या पोटनिवडणुकीविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलीय. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील लोक केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटाची मागणी करत असले तरी त्याची गरज नाही. राज्य सरकारने टाईम बाऊंड कार्यक्रम आखून इम्पेरिकल डेटाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याच्या आरक्षणाचा आकडा ठरवून हा डेटा जर न्यायालयात सादर केला, तर ओबीसींची आरक्षण संरक्षित होऊ शकतं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर त्यापूर्वी निवडणूका होऊ नयेत, अशी भूमिका राज्य सरकारनेही घेण्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. (Pankaja Munde will go to court against Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections)

‘राज्य सरकार डेटा मिळवू शकतं’

भुजबळ यांच्या आरोपांना उत्तर देताना पकंजा मुंडे म्हणाल्या की, 15 महिन्यात या सरकारनं कोर्टात वेळ मागून, पाठपुरावा करुन इम्पेरिकल डेटा देणं आवश्यक होतं. आमच्या सरकारच्या काळात आम्ही इम्पेरिकल डेटासाठी वेळ मागून घेतली होती. पण कोड ऑफ कंडक्ट आणि नंतर सरकार बदलल्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. त्यामुळे इम्पेरिकल डेटाच्या बाबत असलेलं महत्वाचं काम हे या सरकारनं करणं अपेक्षित होतं. हा राज्य सरकारचा विषय आहे. राज्य सरकार डेटा मिळवू शकतं, कायदा करु शकतं, असं असताना हे सरकार काहीच करत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. नागपुरातील लोकांकडून कोर्टात धाव घेण्यात आली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जात आहे, असा प्रश्न विचारला असता, ते लोक कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांची भूमिका काय होती? याचा शोध घेतला गेला पाहिजे, असं उत्तर पंकजा यांनी दिलंय.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं. त्यानंतर राज्य सरकारने वारंवार आश्वस्त करुन याबाबत कारवाईचं आश्वासन दिलं. ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं की निवडणुका होऊ देणार नाही, आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या निवडणुका जाहीर होतात, हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय. हे आम्ही सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करुन या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत. या निवडणुका रद्द केल्या नाहीत तर उग्र आंदोलन भाजप करेल, असा इशारा मी राज्य सरकारला देतोय. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचा विश्वासघात बंद करा, असं माझं राज्य सरकारला आवाहन आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

हस्तक्षेप करा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु, देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच आक्रमक आंदोलनाचा इशारा

OBC reservation : निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी नेते आक्रमक, भुजबळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

Pankaja Munde will go to court against Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...