स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय, पंकजा मुंडे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा

पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय, पंकजा मुंडे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 10:47 PM

मुंबई: राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) विषय अत्यंत संवेदनशील होत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या. (Pankaja Munde said Five ZP and 33 Panchayat Samiti By election is injustice to obc will move to court for oppose decision)

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजाताई म्हणाल्या की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे.

राज्य सरकारनं न्याय द्यावा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असे वक्तव्य राज्य सरकारमधील मंत्र्यांनी देखील केले होते. आम्ही तर याविरूध्द न्यायालयात धाव घेणार आहोत. तथापि,राज्य शासनाने न्याय देण्याची भूमिका तत्काळ घेण्याची गरज आहे.

आमच्यासह कोर्टात धाव घ्या

राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत या निवडणुका न घेण्याची भूमिका मांडण्याबरोबरच आमच्या समवेत कोर्टातही धाव घ्यावी असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील पाच जिल्हा परिषदेतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याने राज्य निवडणूक आयोगाने येथे आचार संहितेसोबत निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली. यात राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या 70 जागांबरोबर 33 पंचायत समितीच्या 130 निर्वाचक गणांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गासह पन्नास टक्के पेक्षा अधिक आरक्षण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत ही पोटनिवडणूक होत आहे.

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडेंबरोबर प्रितम मुंडेही ओबीसी आंदोलनात उतरणार, बीडकरांना केलं ‘हे’ आवाहन

वाशिम जिल्हा परिषदेचा अखेर बिगूल वाजला, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची माहिती फक्त एका क्लिकवर

(Pankaja Munde said Five ZP and 33 Panchayat Samiti By election is injustice to obc will move to court for oppose decision)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.