Special Report | पाहणी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरेंचं लक्ष वेधणारा सांगलीकर!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 02, 2021 | 9:21 PM

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी विजय जाधव नावाच्या व्यक्तीने सातत्यानं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांना एक निवेदन द्यायचं होतं. त्यावेळी तो आपली व्यथा मोठमोठ्यानं मांडत होता. तो व्यक्ती नेमका कोण आहे? आणि तो मुख्यमंत्र्यांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न का करत होता? पाहूया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरपाठोपाठ आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. दोन्ही दौऱ्यात त्यांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं सांगितलं. शहर असो वा गाव… ज्या ठिकाणी पूर येण्याची आणि दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणच्या वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. त्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी विजय जाधव नावाच्या व्यक्तीने सातत्यानं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांना एक निवेदन द्यायचं होतं. त्यावेळी तो आपली व्यथा मोठमोठ्यानं मांडत होता. तो व्यक्ती नेमका कोण आहे? आणि तो मुख्यमंत्र्यांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न का करत होता? पाहूया

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI