Special Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात!

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं. गोव्यातील सर्व 40 नाही पण जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचा गोव्यात जो श्रीगणेशा झालाय. तोच फॉर्म्युला आगामी काळात महाराष्ट्रातही पाहायला मिळेल का ? अशी चर्चा जोरात सुरु झालीय. विशेष म्हणजे संजय राऊतांनी याबाबत अजिबात नाही म्हटलेलं नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 20, 2022 | 11:14 PM

गोवा विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं. गोव्यातील सर्व 40 नाही पण जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचा गोव्यात जो श्रीगणेशा झालाय. तोच फॉर्म्युला आगामी काळात महाराष्ट्रातही पाहायला मिळेल का ? अशी चर्चा जोरात सुरु झालीय. विशेष म्हणजे संजय राऊतांनी याबाबत अजिबात नाही म्हटलेलं नाही.

महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा या तिन्ही पक्षाचे नेते करतात. तर कधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाच्या रथावर स्वार होऊ पाहतात. काँग्रेसच्या याच पवित्र्यामुळं गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचं जमलं नाही. त्यामुळं महाराष्ट्रातही भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होऊ शकते असं राजकीय विश्लेषकांनाही वाटतेय…

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें