Special Report | जळगावात दोन ‘भाऊ’ एकत्र, नाथाभाऊ मात्र एकटे पडले?

पुन्हा एकदा जळगावच्या राजकारणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीनं चर्चा रंगल्या आहेत. जळगाव जामनेरात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकाच गाडीमध्ये बसत चर्चा केलीय.त्यामुळे जळगावात दोन भाऊ एकत्र आले तर नाथाभाऊ मात्र एकटे पडल्याची चर्चा सुरु आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 27, 2022 | 10:45 PM

राज्यात नुकतीच नगरपंचयात निवडणुकांची रणधुमाळी पार पडली. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीची राज्यात सर्वाधिक चर्चा रंगली. बोदवड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, शिवसेनेला समर्थन दिलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालात चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. तर, एकनाथ खडसे यांच्या गटाची सत्ता थोडक्यात हुकली होती.

नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाअगोदर जळगावचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात भेट होऊन चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा जळगावच्या राजकारणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीनं चर्चा रंगल्या आहेत. जळगाव जामनेरात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकाच गाडीमध्ये बसत चर्चा केलीय.त्यामुळे जळगावात दोन भाऊ एकत्र आले तर नाथाभाऊ मात्र एकटे पडल्याची चर्चा सुरु आहे.

बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप सेना छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगत असताना दोन्ही नेते एकाच गाडीमध्ये चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. एकनाथ खडसेंना बोदवड नगरपंचायतीमध्ये होमपीचवर सेनेने धक्का दिला होता. बुधवारी विशेषत: जामनेरमध्ये एक कार्यक्रम आटपून गिरीश महाजन यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव पाटील गेले.यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें