AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | योगी आदित्यनाथ यांच्यावर मोदी खरंच नाराज आहेत का?

Special Report | योगी आदित्यनाथ यांच्यावर मोदी खरंच नाराज आहेत का?

| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 9:27 PM
Share

मुख्यमंत्री योगी आदित्य यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशातील विविध प्रश्नांवर या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्य यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशातील विविध प्रश्नांवर या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. कोरोना हाताळणीत उत्तर प्रदेश सरकारला आलेलं अपयश, गंगा नदीत आढळून आलेले मृतदेह, उत्तर पदेशातील ठाकूर-ब्राह्मण संघर्ष, मोदींचे निकटवर्तीय ए.के. शर्मा यांचा उत्तर प्रदेशातील राजकारणात समावेश या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. त्यामुळे उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशाचं लक्ष या भेटीकडे लागलं होतं. (Meeting between CM Yogi Adityanath and PM Narendra Modi on the backdrop of Uttar Pradesh Assembly elections)