AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Raosaheb Danve यांच्याकडे भाजप-मनसेच्या 'रेल्वे'जोडणीचं काम?-tv9

Special Report | Raosaheb Danve यांच्याकडे भाजप-मनसेच्या ‘रेल्वे’जोडणीचं काम?-tv9

| Updated on: Apr 10, 2022 | 9:10 PM
Share

4 तारखेला मनसे-भाजपच्या युतीबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या रावसाहेब दानवे आज मात्र मनसेबाबत सकारात्मक दिसले. दानवेंनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली.  आणि दानवेंनी राज भेट म्हणून रेल्वेची प्रतिकृतीही दिली. या भेटवस्तूनं मनसे-भाजपत समेट घडण्याच्या चर्चा होतायत. फक्त 6 दिवसात मनसेशी युतीबद्दल रावसाहेब दानवेंची भूमिका मवाळ झालीय.  

4 तारखेला मनसे-भाजपच्या युतीबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या रावसाहेब दानवे आज मात्र मनसेबाबत सकारात्मक दिसले. दानवेंनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली.  आणि दानवेंनी राज भेट म्हणून रेल्वेची प्रतिकृतीही दिली. या भेटवस्तूनं मनसे-भाजपत समेट घडण्याच्या चर्चा होतायत. फक्त 6 दिवसात मनसेशी युतीबद्दल रावसाहेब दानवेंची भूमिका मवाळ झालीय.  दानवे राजकारणात काहीही शक्य असतं, यावर जोर देऊ लागलेयत. योगायोगानं मनसेचं निशाणही रेल्वेच आहे. पण मागच्या ४ महिन्यांपासून सुरु असलेल्या मनसे-भाजप युतीच्या चर्चा अजूनही चर्चाच आहेत.  भोंग्याच्या भूमिकेमुळे मनसेची भाजपशी जवळीक तर झालीय, मात्र स्वपक्षातच कुरबुरी होतायत.  त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे वसंत मोरे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीत वसंत मोरेंची समजूत काढली जाते, की मग वसंत मोरे दुसऱ्या पर्यायाचा विचार करतात, हे पाहणं महत्वाचं आहे.