Special Report | होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह निलंबित होणार ?

संजय पुनुमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. तो मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. पुनुमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे.

मुंबई : मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’ असून, त्यांनी ही मालमत्ता संजय पुनुमियाच्या नावे खरेदी केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय पुनुमियाविरोधात अग्रवाल नावाच्या व्यक्तीने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनुमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय पुनुमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. तो मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. पुनुमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे वृत्त दैनिक लोकमतने 11 ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ही जमीन पुनुमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनुमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पुनुमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI