Special Report | वसंत मोरेचं शहराध्यक्षपद काढलं, पण नुकसान मोरेंचं की मनसेचं?
मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सही असलेले नियुक्ती पत्र पक्षातर्फे जारी करण्यात आले आहे.
मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सही असलेले नियुक्ती पत्र पक्षातर्फे जारी करण्यात आले आहे. मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत राज ठाकरेंच्या निर्णयानंतर वसंत मोरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. “आपली ही नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल” असं या पत्रात साईनाथ बाबर यांना उद्देशून म्हटलं आहे, तर वसंत मोरेंचा कुठलाही उल्लेख या पत्रात नाही.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?

