Special Report | अमेरिकेकडून तिसऱ्या महायुद्धाचे संकेत? -Tv9
रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्यस्थळे उद्धवस्त केले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. दरम्यान रशिया – युक्रेन युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीववर (Kiev) केलेल्या हल्ल्यात मोठं नुकसान झालं आहे. अनेक इमारती उद्धवस्त झाल्या असून, हजारो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्यस्थळे उद्धवस्त केले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. दरम्यान रशिया – युक्रेन युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ते बोलताना म्हणाले की, रशियाने आता आमच्यापुढे केवळ दोनच पर्याय शिल्लक ठेवले आहेत. एक म्हणजे तिसरे महायुद्ध किंवा रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालणे हे आहेत. दरम्यान अमेरिकेकडून या पूर्वीच या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध घातले असून, युरोपीयन संघामधील देशांनी रशियन बँकांना स्विफ्टमधून निष्कासीत केले आहे.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

