AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | चीनचा रशियाला पाठिंबा, नव्या मैत्रीचा नजराणा? -Tv9

Special Report | चीनचा रशियाला पाठिंबा, नव्या मैत्रीचा नजराणा? -Tv9

| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 9:24 PM
Share

चीन रशियाला अप्रत्यक्षरित्या मदत करताना दिसून येत आहे. रशियाशी व्यवहार तोडण्यास चीनने दोन दिवसांपूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात झुपी युती उदयाला येतेय का? असा सवाल आता उपस्थित झालाय.

रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या  पार्श्वभूमीवर यूक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की  यांनी मंगळवारी यूरोपीय यूनियनमध्ये संबोधित केलं. आपल्या संबोधनात जेलेन्स्की म्हणाले की स्वत:ला यूरोपियन यूनियनमध्ये पाहून आनंद झाला. आपल्याला इथं येण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागेल हा विचार केला नव्हता. रशिया आमच्या रहिवासी भागाला निशाणा बनवतोय. आम्ही हजारो यूक्रेनी नागरिकांना गमावलं आहे, अशी खंत जेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय. महत्वाची बाब म्हणजे यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना संबोधनानंतर स्टॅन्डिंग ओवेशन मिळाली. दुसरीकडे चीन रशियाला अप्रत्यक्षरित्या मदत करताना दिसून येत आहे. रशियाशी व्यवहार तोडण्यास चीनने दोन दिवसांपूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात झुपी युती उदयाला येतेय का? असा सवाल आता उपस्थित झालाय.