कोट्यवधी वारकऱ्यांच्या आस्थेचं स्थान असलेलं पंढरपूरचं मंदिर पूर्वी बौद्ध विहार होतं, असा दावा अभ्यासक डॉक्टर प्रदिप आगलावे यांनी केलाय. जर मंदिर-मशिदींचा वाद सुरु असेल, तर मग ज्या बौद्ध विहारांवर मंदिर उभी राहिली, ती मंदिरे सुद्धा बौद्धांना परत करावीत, असा दावा आगलावेंनी केलाय.नआगलावे हे नागपूर विद्यापीठात प्राध्यापक होते, समाजशास्रावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलीयत. आंबेडकरी साहित्य आणि चळवळीचे ते सक्रीय कार्यकर्ते आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या आंबेडकर चरित्र साधने प्रकाशनाचे ते सचिव सुद्दा आहेत. त्यांच्या या दाव्यावर आम्ही वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला., मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. आगलावेंनी या दाव्यासाठी प्रबोधनकारांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचाही दाखला दिलाय. आगलावेंच्या दाव्यानुसार पुस्तकात अनेक मंदिरे ही पूर्वी बौद्ध विहार होते., असं नमूद करण्यता आलंय.