माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा
विधानसभेचं हिवाळी अधिवेशन काम कमी आणि गदारोळानं जास्त गाजतंय. शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाषण देखील चांगलेच गाजले. माझ्यानंतर उद्धव ठाकरे यांना साथ द्या, अशी भावनिक साथ त्यांनी शिवसैनिकांना घातली.
नवी दिल्ली : विधानसभेचं हिवाळी अधिवेशन काम कमी आणि गदारोळानं जास्त गाजतंय. कालचा दिवस तर नितेश राणे, सुहास कांदे, भास्कर जाधव, फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजला. पण त्याच वेळेस विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम. (Ramdas Kadam) विशेष म्हणजे दोघांनाही भाई म्हटलं जातं. रामदास कदमांनी निरोपाचं भाषण मात्र आटोपशीर केलं. अवघ्या सात मिनिटात त्यांचं भाषण संपलं पण हेच सात मिनिटांचं भाषण चर्चेत राहिलं. त्याला कारण आहे ते रामदास कदम यांचं गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबतच सुरु असलेलं भांडण. त्याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला. कोकणासाठी काय करु शकले नाहीत, तेही रामदास कदमांनी यावेळी आवर्जून सांगितलं. तसेच माझ्यानंतर उद्धव ठाकरे यांना साथ द्या, अशी भावनिक साथही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना घातली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

