MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 14 October 2021

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावरचा निर्णय आता 20 ऑक्टोबरला होईल. आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीवर कोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे.

आर्यन खानच्या अडचणी या संपण्याचा नाव घेत नाहीत. नुकतंच कोर्टानं आर्यन खानच्या जामीनावरचा निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुढील आणखी 6 दिवस आर्यन खानला जेलमध्येच काढावे लागतील. आर्यनच्या जामिनावरचा निर्णय आता 20 ऑक्टोबरला होईल. आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीवर कोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे.

आर्यन खानसह इतर आठ आरोपींच्या जामीन अर्जावर आज सकाळपासून सुनावणी सुरु होती. या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. पण कोर्टाने याबाबतचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यनसह इतर आरोपी न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत. एनसीबीच्या वकिलांचा वकिलांचा आज एक वाजेपासून युक्तीवाद सुरु होता. लंच ब्रेकनंतरही त्यांचा युक्तीवाद सुरु होता. आरोपींच्या वकिलांनी सुद्धा युक्तीवाद केला. पण या प्रकरणाचा निकाल 20 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. कारण पुढील पाच दिवस दसरा आणि इतर शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे सुनावणीचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. विशेष म्हणजे कालपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. त्यामुळे आर्यनसह इतर आरोपींना आज दिलासा मिळेल, अशी चर्चा होती. पण आता पुढचे पाच दिवस आरोपींना जेलमध्येच राहावं लागेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI