आमच्या घराघरात वाढते मराठी?; सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयातच नापास….आकडा ऐकून धक्काच बसेल, मातृभाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयातील कामगिरी चिंताजनक ठरली आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र मराठी विषयात तब्बल 94,544 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयातील कामगिरी चिंताजनक ठरली आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र मराठी विषयात तब्बल 94,544 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. सुमारे 80,803 विद्यार्थी हे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊनही नापास झाले आहेत. यामुळे मातृभाषेच्या शिक्षणाच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठी भाषा बारावीपर्यंत सक्तीची असूनही प्रत्यक्ष निकालात अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही.
जाणकारांच्या मते, इंग्रजी माध्यम आणि कॉन्व्हेंट संस्कृतीकडे वाढता कल हे यामागील एक प्रमुख कारण मानले जात आहे. घरात आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर कमी होत चालल्याने विद्यार्थ्यांचा भाषेवरील पाया कमकुवत होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.तसेच, व्याकरणातील चुका, र्हस्व-दीर्घातील गोंधळ, शुद्धलेखनातील त्रुटी आणि अवांतर वाचनाची कमी झालेली सवय यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रहही घटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गुण कापले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर आता शाळांमध्ये मराठी शिकवण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. केवळ पाठांतरावर भर न देता भाषेची आवड, उपयोजन आणि संवाद कौशल्य विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. मराठी विषयाची ही स्थिती सुधारण्यासाठी केवळ सक्तीचे नियम नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल आत्मीयता निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचेही बोलले जात आहे.
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....

