ST Strike | नियमित कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली

राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत.

मुंबई : एक महिना उलटून गेला तरी तब्बल 72 हजार एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. एसटीच्या मोठ्या संपानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, हे आधीच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

19 हजार एसटी कर्मचाऱ्यांचे पगार जमा

राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. एसटी संपकरी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12% वरून 28% करण्यात आला, घरभाडे भत्ता 8-16-24 या पटीत वाढवून देण्यात आला. तसेच अंतरिम वेतन वाढ देखील दिली. अशी माहिती देण्यात आली आहे. तर जे कर्मचारी संपावर आहेत त्याचे पगार झाले नाहीत. अजूनही जवळपास 72 हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI