‘… हे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही’, राष्ट्रवादीच्या नेत्यानं शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं
VIDEO | नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे आता गप्प का? नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेत्याचा रोख कुणावर?
पुणे : दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील स्वातंत्र्यवीर सावरकर जंयतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आल्याने राज्यातील काँग्रेससह राष्ट्र्वादी काँग्रेसने केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्यानंतरही राज्यात गोंधळ घालणारे आमदार गोपीचंद पडळकर हे गप्प का? असा सवाल आता आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का? नाव न घेता रोहित पवार यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

