Vaishnavi Hagawane : …म्हणून तिनं आत्महत्या केली, नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? हगवणेंकडून अजब युक्तिवाद
सुनेच्या छळाचे आरोपी हागवणे यांनी कोर्टात अजब असा युक्तिवाद केलाय. मृत असून वैष्णवीच्याच चरित्रावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी अजब असे तर्क मांडलेत
हुंड्यासाठी सुनेचा छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हागवणेंनी आता मृत वैष्णवीच्या चरित्रावरच आरोप सुरू केले आहेत. वकिलांमार्फत कोर्टामध्ये हागवणेंनी स्वतःला निर्दोष ठरवत मृत वैष्णवीवरच दोषारोप केले.
‘वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसंबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता, त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून तिने आत्महत्या केली असेल. वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्याची होती. वैष्णवीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदीर मारण्याचे औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? हागवणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. ते कुटुंब 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ करेल का? हागवणे कुटुंबाचं सोने घरच्या व्यवसायासाठी गाहाण ठेवलंय. सोन्याच्या दागिन्याविषयी माध्यमांमध्ये चुकीचं सांगितलं जातेय. निलेश चव्हाण आरोपी नाहीच, त्याने बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं. तर प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का?’, या हागवणेंच्या अजब युक्तिवादावर सडकून टीका होते.
वैष्णवीच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. त्या जखमांचे वर्णन पाहून तिला जबर मारहाण झाल्याच स्पष्टपणे जाणवतं. मात्र तरीही प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार नाही असा युक्तिवाद हागवणेंकडनं केला गेला.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

