Karuna Sharma : नुसता माज, सौंदर्य पाहून पद… रूपाली चाकणकरांवर करूणा शर्मा भडकल्या, काय दिला इशारा?
राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली पण कारवाई झाली नाहीच, करुणा शर्मांनी थेट 'त्या' महिलांना माध्यमांसमोर आणलं आणि रूपाली चाकणकरांवर केला हल्लाबोल
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करूणा शर्मा यांनी हल्लाबोल केला आहे. रूपाली चाकणकरांनी कोणत्याही महिलेल्या न्याय दिला नाही. सत्तेत असल्यामुळे रूपाली चाकणकरांच्या डोक्यावर माज आहे. तर रूपाली चाकणकरांना फक्त सौंदर्य पाहून पदं दिलं असल्याचं म्हणत करूणा शर्मा यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे. जर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्यातील महिलांच्या तक्रारी सोडवल्या नाही तर राज्य महिला आयोगाच्या समोर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशाराही करूणा शर्मा यांनी दिलाय. नुसतं राष्ट्रवादीचा प्रचार करणं, इकडे भाषण तिकडे भाषणं करणं हे तुमचं काम नाही. तुमचं महिलांना न्याय द्यायचं काम आहे. रूपाली चाकणकर यांनी उल्लेख केलेल्या चिल्लर या शब्दावरून करूणा शर्मा यांनी भाष्य करत त्यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. बघा नेमकं काय म्हटलं?