शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर दहावी बारावी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी आंदोलन केले. धारावीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.
महाराष्ट्राच्या (Maharashtra) शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikawad) यांच्या धारावीतील घरासमोर दहावी बारावी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा (Online Exam) घेण्यासाठी आंदोलन केले. धारावीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. यानंतर लाठीचार्ज करण्यात आल्याने काही काळासाठी विद्यार्थी पांगले असेल तरी त्या ठिकाणी पुन्हा जमू लागले होते. त्यामुळे पुन्हा लाठीचा मार खावा लागेल अशी सुचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आली. या आंदोनात हिंदूस्तानी भाऊ अशा नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदूस्थानी भाऊ म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची माहिती पोलीस घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

