राजकारणात यश अपयश चढ-उतार येत असतात माणसं आणि नात्यातला ओलावा हाच आयुष्यात टिकतो -सुप्रिया सुळे

कुठल्याही घरात भांड्याला भांड लागलं तर एखादा मुलगा किंवा मुलगी रुसून गेली तर आई वडील प्रश्न सोडवतात. त्यामुळे प्रश्न चर्चेने सुटतात. राजकारणात यश अपयश चढ-उतार येत असतात माणसं आणि नात्यातला ओलावा हाच आयुष्यात टिकतो

प्राजक्ता ढेकळे

|

Jun 28, 2022 | 6:22 PM

मुंबई – मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा खूप अभिमान वाटतो.  घरातला मोठा भाऊ कसा असावा? तर तो उद्धव ठाकरे सारखा असावा असे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी व्यक्त केलं आहे. टेलेव्हीजन वरून नाती आणि सरकार चालत नाही अशी टीका सुळे यांनी बंडखोरआमदारांवर(MLA)  केली आहे. घरातील एक मुल चुकत असले तर त्याची चुक पदरात घेणे, चर्चाकरून त्यावर मार्ग काढला पाहिजे असे त्यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या कृतीमध्ये मला माँ संवेदनशीलता दिसतेअसेही त्या म्हणालया आहेत. कुठल्याही घरात भांड्याला भांड लागलं तर एखादा मुलगा किंवा मुलगी रुसून गेली तर आई वडील प्रश्न सोडवतात. त्यामुळे प्रश्न चर्चेने सुटतात. राजकारणात यश अपयश चढ-उतार येत असतात माणसं आणि नात्यातला ओलावा हाच आयुष्यात टिकतो

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें