रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग, जिल्ह्यात रंगली ‘पालकमंत्री प्रिमियर लीग’
रायगड पालकमंत्री पदाच्या वादानंतर आता रायगड प्रीमियर लीगमध्ये ही जणू पालकमंत्री प्रीमियर लीग रंगते की काय? अशी चर्चा होते आहे. कारण आहे खेळाच्या मैदानातून होणारी राजकीय टोलेबाची.
रायगड पालकमंत्री पदाच्या वादानंतर आता खेळाचही मैदान व्यापलंय. एकीकडे वादावर आमचे जेष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगून नेत्यांची टोलेबाजी थांबताना दिसत नाहीये. रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये आदिती चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर तटकरेंनी गोगावले यांना शाब्दिक टोले लगावले. रायगडच पालकमंत्रिपद आधी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आलं. शिवसेनेच्या आक्षेपानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली गेली. तेव्हापासून आजवर हा वाद कायम आहे. पंचाचा निर्णय अंतिम असतो म्हणणाऱ्या तटकरेंना शिंदे गटाच्या शिरसाट यांनी वेळ पडल्यास पंचाचाही निर्णय बदलावा लागतो असं उत्तर दिलंय. दरम्यान, शिवसेनेच्या खटल्यात प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावेळेची नियुक्ती कायमस्वरूपी बेकायदेशीर ठरवली नाही म्हणून पुन्हा गोगावले यांना प्रतोद म्हणून ग्रीन सिग्नल दिला होता. आता रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल कोणाला ग्रीन सिग्नल मिळेल याची प्रतीक्षा आहे. त्यावरून अंपायर देऊन असतो अनेकदा थर्ड अंपायर कडेही निर्णय जातो असं गोगावले यांनी म्हटलं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट