AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 12 December 2021

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 12 December 2021

| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 2:59 PM
Share

चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) अधिकृत बोलावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.

चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) अधिकृत बोलावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. यावेळी त्यांनी साऱ्या विषयावर आपले मत व्यक्त केले. मात्र, महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार का, या प्रश्नाला सोयीस्करपणे बगल दिली.

राज म्हणाले, एसटीच्या संपाची मी माहिती घेतली आहे. सगळ्या संघटना बाजूला सारून हा संप सुरू आहे. लोकांसाठी राज्य असते. त्यांच्याशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये. कर्मचाऱ्यांच्या मागण्या, प्रश्न समजावून घ्या. त्यांचे चार-चार महिने पगार नाहीत. दिवाळी पगाराविना गेली. अशात तुम्ही अरेरावीची भाषा करता. हे योग्य नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय खासगीकरण करण्याऐवजी एखादी मॅनेजमेंट कंपनी काढा. इकडे मात्र, तुम्ही एकही पाऊल उचल नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून देऊन अरेरावाची भाषा करणे योग्य नाही. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, असा प्रश्न राज यांनी विचारला.