SuperFast 50 News | 2.30 PM | 15 September 2021

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. सण-उत्सवांचा कालावधी त्यांच्या निशाण्यावर होता.

बंगाली भाषेत बोलणारे आणि पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परत आलेले 16 जण पश्चिम बंगालमध्ये लपले असू शकतात, असा दावा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आम्हाला पैशांचा लोभ नाही, फक्त जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो, असं दहशतवाद्यांनी सांगितल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा (Pakistan-organised module) भांडाफोड करत मंगळवारी सहा जणांना अटक केली.

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. सण-उत्सवांचा कालावधी त्यांच्या निशाण्यावर होता. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सांगितले, की गर्दी असलेल्या प्रत्येक भागात हल्ला करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी या संदर्भात अनेक ठिकाणी रेकी केली होती, तर अनेक ठिकाणी त्यांना रेकी करणं बाकी होतं. यामध्ये मुंबईतील वर्दळीची ठिकाणं, लोकल ट्रेन, मोठी मंदिरे, तसेच उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानाचा समावेश असल्याचं बोललं जातं. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, रामलीला आणि निवडणूक सभा होणाऱ्या मोठ्या मैदानांचा यात समावेश आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI