SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 October 2021
मागील आठवड्यातील भारतीय उपखंडात सुरु असलेल्या हवामानातील बदलांनुसार येत्या 16,17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘जवाद’ चक्री वादळाचा (Jawad cyclone) तडाखा बसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. मात्र मागील चार दिवसात चक्रीवादळाची दिशा बदलली असल्याने या तडाख्यातून महाराष्ट्राची सुटका झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही परतीच्या पावसाचा धिंगाणा सुरुच आहे.
हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पुढील पाच सहा दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता होती. याचा फटका 14 ऑक्टोबरदरम्यान आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगडला बसणार होता. तर महाराष्ट्रातील विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस 16 आणि 17 ऑक्टोबर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा