SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 18 September 2021

पालघर तालुक्यातील कोरे येथील समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या स्थानिक मच्छीमारांनी याबाबतची माहिती तात्काळ केळवे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी बॉम्ब डिटेक्शन डिसपोजलच्या साहाय्याने संबंधित स्फोटकीय वस्तू निष्क्रिय केली.

येत्या नवरात्रीचं निमित्त साधून आयसीसच्या दहशतवाद्यांचा देशातील विविध भागांमध्ये मोठा घातपात घडवण्याचा कट होता, अशी माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आलीय. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 9 अतिरेक्यांना अटक केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. पण राज्यासह देशभरातील नागरिक आता अलर्ट झाले आहेत. मुंबईत 26/11 चा जो हल्ला झाला होता तेव्हा अतिरेकी हे पाकिस्तानातून समुद्रमार्गाने आले होते. त्यामुळे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूीमीवर समुद्रात मासेमारी करणारे मच्छिमार हे सावध झाले आहेत. या दरम्यान पालघरच्या समुद्र किनारी मच्छिमारांच्या मनात धडकी भरवणारी घटना घडली. संबंधित परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. यावेळी त्या वस्तूमधून धूर निघत असल्याने मच्छिमारांचा संशय आणखी बळावला.

पालघर तालुक्यातील कोरे येथील समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या स्थानिक मच्छीमारांनी याबाबतची माहिती तात्काळ केळवे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी बॉम्ब डिटेक्शन डिसपोजलच्या साहाय्याने संबंधित स्फोटकीय वस्तू निष्क्रिय केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI