SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 21 October 2021

किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ईडी कार्यालयात जाऊन या घोटाळ्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर कारखान्याशी काही लोकही होते. अजित पवारांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला आहे. गुरु कमोडीच्या नावाने हा कब्जा घेतला आहे. हा गुरु कोणी व्यक्ती आहे का? अजित पवारांनी गुरु नाव का दिलं या कंपनीला. एका बाजुला गुरु कमोडीत लेअर उभे केले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याचा घोटाळा ईडीसमोर मांडला आहे. या घोटाळ्याची मोड्स ऑपरेंटीही सोमय्या यांनी ईडीला सांगितली. तर या प्रकरणाचा अभ्यास करत असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमय्यांना सांगितलं. त्यामुळे अजित पवारही ईडीच्या कचाट्यात सापडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ईडी कार्यालयात जाऊन या घोटाळ्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर कारखान्याशी काही लोकही होते. अजित पवारांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला आहे. गुरु कमोडीच्या नावाने हा कब्जा घेतला आहे. हा गुरु कोणी व्यक्ती आहे का? अजित पवारांनी गुरु नाव का दिलं या कंपनीला. एका बाजुला गुरु कमोडीत लेअर उभे केले. दुसऱ्या बाजूला जरंडेश्वर मिल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये लेअर्स निर्माण केले. ज्या बिल्डरांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या, त्या दोन्ही बिल्डरकडे माया सापडली. त्यांनी अजित पवारांना 2008मध्ये 100 कोटी रुपये दिले होते. व्याज नाही. काही नाही असेच दिले. एका दमडीचा इंट्रेस्ट दिला नाही. आजही ते पैसे अजित पवारांकडे पडून आहे. हा सर्व घोटाळा ईडीसमोर मांडला. हायकोर्टात ऑब्जर्वेशन द्यावं अशी विनंती केली आहे, असं सोमय्या म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ संस्थापक इथे आले आहेत. कारखाना सुरू आहे. सुरू राहिल. कामगारांचं काम सुरू राहील. शेतकरी सुरक्षित राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI