SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 24 June 2021

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांचं प्रमाण कमी असलं तरी त्याचा संक्रमणाचा दर जास्त असू शकतो, अशी भीती टोपे यांनी यावेळी व्यक्त केलीय.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने चिंता वाढवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांचं प्रमाण कमी असलं तरी त्याचा संक्रमणाचा दर जास्त असू शकतो, अशी भीती टोपे यांनी यावेळी व्यक्त केलीय. टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत डेल्टा प्लस प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोणत्या प्रकारची काळजी घेत आहे, याची माहिती दिलीय. 15 मे पासून राज्य सरकारने याबाबत कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्य सरकार दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत. आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ अद्याप झालेली नाही. हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे डेल्टा प्लस प्रकार आढळलेले 21 रुग्णांचं विलगीकरण आपण करत आहोत. त्यांचं निरीक्षण केलं जात असून, त्यांच्याबाबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सुरु असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे सुदैवानं डेल्टा प्लसमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. केंद्र सरकारला ही माहिती पाठवण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI