SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 29 August 2021

आमच्यात दम आहे, मी इथे सर्वांसमोर सांगतो, नारायण राणेच्या पोरांना मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. फक्त सगळे जिल्हा प्रमुख आमच्यासोबत द्या. आम्ही करतो सगळं, काय करायचं ते आम्ही करतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Aug 29, 2021 | 8:32 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल, तर आम्ही सहन करणारे शिवसैनिक नाहीत. त्यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना मारणार असल्याची मुक्ताफळे, बीडचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी उधळली आहेत. (We will hit Narayan Rane’s son, Shiv Sena sub-district presidents warning)

शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना गणेश वरेकर म्हणाले की, नारायण राणेसोबत, कोंबडीचोरासोबत आपला वाद सुरु आहे. उद्धव साहेबांबद्दल कोणीही काहीही बोललेलं सहन करणारे आम्ही सैनिक नाही. सगळे युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख केवळ पैसे कमावण्याच्या मागे आहेत. मात्र आम्ही शांत बसणारे नाही. आमच्यात दम आहे, मी इथे सर्वांसमोर सांगतो, नारायण राणेच्या पोरांना मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. फक्त सगळे जिल्हा प्रमुख आमच्यासोबत द्या. आम्ही करतो सगळं, काय करायचं ते आम्ही करतो. आमची तयारी आहे. नारायण राणेसोबत लढायची तयारी आहे. साहेब आमचं दैवत आहेत. आमच्या दैवताला कोणी काही बोललेलं आम्हाला सहन होणार नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें