मुकेश अंबानी कुटुंबाला देशासह परदेशात Z+ सुरक्षा, सुप्रीम कोर्टानं काय दिला मोठा निर्णय?
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना केवळ मुंबईतच नाही तर देशभरासह परदेशातही Z+ सुरक्षा पुरवण्याचे आदेश
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगभरात Z+ सुरक्षा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाकडून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना केवळ मुंबईतच नाही तर देशभरासह परदेशातही Z+ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिल्याने अंबानी कुटुंबासाठी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मानले जात आहे. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात जास्त श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याची बातमी समोर आली होती. याशिवाय मुकेश अंबानी यांचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून देण्यात येते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे.

