AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Power Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर भाजप-ठाकरे गट आमने सामने; मुनगंटीवार यांच्या टीकेवर सावंत यांचा पलटवार

Maharashtra Power Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर भाजप-ठाकरे गट आमने सामने; मुनगंटीवार यांच्या टीकेवर सावंत यांचा पलटवार

| Updated on: May 11, 2023 | 9:46 AM
Share

त्यांनी प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालाच्या घटनापीठाकडून राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर मंत्री मुनगंटीवर यांनी भाष्य केले.

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून निकाल दिला जाणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान भाजप नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालाच्या घटनापीठाकडून राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर मंत्री मुनगंटीवर यांनी भाष्य केले. सत्तासंघर्ष असता तर आम्ही या कार्यक्रमाला आलो असतो का? तर असं आमदारांना अपात्र करता येत नाही. अपात्रतेचा आता प्रश्‍न उपस्थितच होत नाही. त्यामुळं सत्याचाच विजय होतो आणि होईल. यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी पलटवार करताना टीका केली आहे. त्यांनी हे भाजपवाले आणि ठाकरे गट निवडणूक आयोगाप्रमाणेच सर्वोच्च न्यायलय निकाल देईल असं म्हणत आहेत. महाशक्ती काही करत आहे का? असा सवाल केला आहे. तर सर्वोच्च न्यायलयाचे बसलेले न्यायाधिश हे संविधानाचे संरक्षण नक्कीच करतील असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला आहे.

Published on: May 11, 2023 09:46 AM